रंगसंगती

Published on by अनिश्का

घराची अंतर्गत रचना अर्थात ईंटिरियर डिझायनिंग करताना महत्वाचं काय असतं?  फर्निचर , फ्लोरिंग , वेगवेगळ्या अॅक्सेसरीज, ईलेक्ट्राॅनिक वस्तु... हो हे तर महत्वाचं असतंच, पण अजुन एक गोष्ट खुप महत्वाची आहे आणि ती म्हणजे रंगसंगती. 
रंगाचा वापर करण्यामागे जसे काही अर्थ , काही कारणं असतात , तसेच रंगाचे वेगवेगळे परिणाम ही होतात. कसे? 
पाहुया तर मग..... 
रंगाने घरातील वातावरण तर बदलतेच पण रंग माणसाचा मुड आणि स्वभावही बदलु शकतो बरं का! 
स्वभावातील नकारात्मक बदल सकारात्मक करण्याची किमया रंग करतात. मन एकाग्र करुन , मनाची कार्यक्षमता ही रंगच वाढवतात. एखाद्या रंगाने मन आनंदी , प्रसन्न होते. 
असे हे रंग आपल्या घराचा अन् संस्कृतीचाही मोठा भाग आहेत. 
आता परत वळुयात ईंटिरियर कडे. रंगाची निवड ही त्या त्या रुम ला मोठं किंवा लहान बनवु शकते.. कसं? 
एखाद्या रुम ला गडद रंग दिला तर ती रुम अजुन लहान, अंधारलेली वाटु शकते. तेच जर तुम्ही त्या रुम ला फिका रंग दिला तर ती मोठी , प्रशस्त दिसते. 
पण गडद रंगही कलात्मकरित्या वापरुन आपल्याला सुंदर ईफेक्ट मिळतो बरं का! 
घराची रंगसंगती ठरवणे थोडे चॅलेंजींग असले तरी अवघड मुळीच नाही हं!
रंगसंगती म्हणजेच कलर स्कीम ठरवताना सर्वप्रथम काही बाबी लक्षात घ्याव्यात. जसे , तुमचे घर किती मोठे / लहान आहे , फर्निचर , कारपेट , वाॅलपेपर , फ्लोरिंग , टाईल्स कोणत्या रंगाचे आहेत वगैरे. 
ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कलर स्कीम ठरवली तर पुढचा पेपर सोप्पाच आहे की. 
चला तर मग कलर स्कीम काय असते ते पाहुयात. 

.  Neutral colour scheme ( न्युट्रल कलर स्कीम )                    

या कलर स्कीम मध्ये क्रीम , ग्रे , बेज , फक्त काळा , फक्त पांढरा हे रंग असतात. हे रंग नॅचरल मटेरियल वर आधारीत असतात. जसे जमीन , दगड ई. जुन्या काळात हाॅलिवुड मुव्हीज मध्ये ही रंगसंगती हिट होती. आता ही याचा ट्रेंड सुरु झालाय. 

२. Warm colour scheme ( वाॅर्म कलर स्कीम ) 

वाॅर्म कलर स्कीम मध्ये लाल , लाल+जांभळा , नारंगी , पिवळा , पिवळा +नारंगी असे रंग येतात. हे रंग जास्त प्रभावशाली असतात. घरात या रंगाचा योग्य वापर न केल्याने किंवा अतीवापर केला तर ते अंगावर आल्यासारखे वाटतात. जसे , रुम लहान किंवा जास्त उंच वाटु शकते. जर सिलींग व फ्लोरिंग या रंगात रंगवले तर रुम फार बुटकी भासु शकते..
 पण जर योग्य तर्हेने याचा वापर केला तर घरात  प्रशस्त , उबदार वातावरण तयार होतं.  म्हणुन ही कलर स्कीम चुझ करताना जरा सावधपणे रंग निवडावेत.

3. Cool colour scheme ( कुल कलर स्कीम )                                                                    

  यात प्रामुख्याने हिरवा, निळा + हिरवा , निळा , निळा+जांभळा हे रंग येतात . हे रंग हेवी किंवा अंगावर येणारे नसतात. ही कलर स्कीम वापरुन एखाद्या लहान जागेला मोठं किंवा कमी उंचीच्या जागेला प्रशस्त असल्याचा फील आपण देऊ शकतो.

४. Complementary colour scheme ( काॅम्प्लीमेंटरी कलर स्कीम )                                  

   यामध्ये दोन्ही म्हणजेच वाॅर्म आणि कुल रंगसंगती मधले रंग येतात. जे एकमेकांना पुर्ण पणे विरोधी असतात. जसे लाल+हिरवा , निळा + नारंगी , पिवळा + जांभळा ई. या प्रकारची रंगसंगती घरात उत्तम फील देते. रंग जरी विरोधी असले तरी ह्या प्रकारचे काॅम्बिनेशन डोळ्यांना सुखावणारे ठरते. शिवाय हल्ली हाच ट्रेंड सेट झालाय. या मध्ये टरक्वाईज ब्लू + ग्रे , आॅलिव्ह ग्रीन + क्रिमसन , लाईट ग्रीन + साॅफ्ट पिंक , आॅलिव्ह ग्रीन + टरक्वाईज ब्लू हे काॅम्बिनेशन्स अशक्य सुंदर दिसतात .

रंगसंगती सिलेक्ट करताना या बारिक सारिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं घरही ट्रेंडी आणि हटके दिसेल ही गॅरेंटी अनिश्का ची . 

 

 

To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post
T
खूप सूदंर माहीति आहे.
Reply
Thanks