बिझनेस

Published on by अनिश्का

ताडताड पावलं वाजवत रेवा धाडकन दरवाजा उघडून घरात शिरली. चेहरा लालबुंद, डोळे पाण्याने डबडबलेले. तिच्या मागून मयांक आला आणि बॅग सोफ्यावर फेकून चिडून रेवा ला म्हणाला, " अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? का निष्कारण चिडते आहेस? मी मिटिंग मध्ये फक्त एवढंच म्हणालो की तुझे डिटेल्स टेक्निकली राँग आहेत त्यात इतकं चिडायला काय झालंय?? "

"रागवायला काय झालं? माझे डिटेल्स मी तुझ्याकडून अप्रुव्ह करून घेतलेले ना? तू ओके होतास तेव्हा. पण जेव्हा प्रतीक्षा ने ते डिटेल्स चूक आहेत हे तुझ्या डोक्यात भरवून दिलं , तेव्हा अचानक तुला ते चूक वाटू लागले? " रेवा अजूनच चिडून म्हणाली.

"हे बघ तिला ते डिटेल्स का चूक वाटले हे तिने प्रॅक्टिकल देऊन समजवून दिलं. तू होतीस न तिथे? तुला कळलं न तुझी मिस्टेक कुठे झाली?? मग इतका आक्रस्ताळेपणा का करतेयस??? " मयंक चिडून म्हणाला.

"बरोबर! मी आक्रस्ताळेपणा च करणार. ती प्रतीक्षा एकटीच स्मार्ट आणि कूल आहे. " रेवा.

" गॉड यु आर सिक! ". मयंक च डोकं फिरत चाललेलं रेवा वर आता.

" ओह रियली?? येस यु आर राईट. नाऊ आय एम सिक ! यु आर ब्लडी फकिंग राईट...."

" तुझ्याशी बोलणंच बेकार आहे रेवा... " धाडकन दरवाजा आपटून मयंक बाहेर गेला...

रेवा ला संतापाने अजून रडायला आलं..

रेवा आणि मयंक ! हॅप्पीली मॅरीड कपल. सुंदर , एकमेकांना अनुरूप, प्रचंड हुशार आणि दोघेही आर्किटेक्ट. एकाच कंपनीत दोघेही टीम लीडर. नवरा बायकोचं नातं , प्रेम , लाड घरा पुरतं मर्यादित ठेऊन ऑफिस मध्ये प्रोफेशनली एकमेकांशी वागणारे! म्हणूनच बॉस चे ही लाडके. थोडक्यात काय तर पिक्चर परफेक्ट... सर्व मस्त नीट , सुखात , आनंदात चाललेलं, चार महिन्यांपूर्वी प्रतीक्षा जॉईन होई पर्यंत !

प्रतीक्षा ! 5'-8" उंच, गव्हाळ बांधा , तेजस्वी डोळे, खूप हुशार आणि कामात खूप प्रामाणिक. चेहरा कायम हसरा आणि कायम कामात मग्न. काम झालं की घरी जायचं , ऑफिस असेल तेव्हा लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसायचं. कामाची क्वालिटी , मेहनत वाखाणण्याजोगी. ऑफिस मध्ये तिचं स्थान मजबूत व्हायला वेळ लागला नाही. परिणामी काही दिवसातच ट्रेनी पासून तिला मयंक च्या टीम मध्ये प्रमोशन मिळालं.... मयंक ही तिच्या कामावर खुश होता. तिला एकदा सांगितलेलं काम पुन्हा सांगावं लागत नसे. मयंक खूप इम्प्रेस झालेला तिच्या कामावर ... घरातही बोलताना तिच्याबद्दल बोलत असे, तिचे डिटेल्स कसे मस्त असतात, ड्रॉईंग ची फिनिशिंग जबराट असते इथपासून रेवा तू पण तिच्याकडून डिटेल्स शिकून घे इथपर्यंत....

बस इतकंच पुरेसं होत रेवा ला इरिटेट होण्यासाठी. प्रतीक्षा आता तिच्या डोक्यात जायला लागलेली. प्रतीक्षा ची हुशारी रेवा ला ओव्हरस्मार्टनेस वाटू लागलेला. मयंक च्या मनात एक कलीग पेक्षा प्रतीक्षा साठी दुसरी कुठलीही भावना नव्हती. पण रेवा ला ते कळत नव्हतं. ती ईनसिक्युअर व्हायला लागली! यावरून एकदोनदा त्यांच्यात वादही झाले. पण आजचा प्रकार जास्त झाला.

रेवा ला वाटत होतं की अशी काय जादू केलीय प्रतीक्षा ने ह्याच्यावर की ह्याला प्रतीक्षा सोडून दुसरं काही दिसतच नाहीय!

इकडे मयंक विचारात पडलेला की रेवा ला काय झालंय? अशी का वागतेय ही? प्रतीक्षा आहे हुशार तर आहे. ही इतकी का चिडतेय? काही केल्या त्याला उत्तर मिळेना.

मयंक बऱ्याच वेळाने घरी आला. बघतो तर घरात पूर्ण अंधार. त्याने लाईट्स ऑन केले, रेवा ला हाका मारल्या.... नो रिप्लाय.. तो तसाच बेडरूम मध्ये गेला. रेवा एका कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसलेली. एव्हाना मयंक चा राग कमी झालेला. त्याने रेवा जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. रेवा ने वर पाहिलं. रडून लाल झालेले डोळे पुसता पुसता तिला परत रडू आलं.

मयंक बराच वेळ तिच्या पाठीवर प्रेमाने , काळजीने हात फिरवत राहिला. तिला पाणी आणून दिलं. पाणी पिऊन रेवा जरा सावरली. तिचा राग गेला नसला तरी कमी झाला होता.

मयंक ने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत तिला विचारलं, " सोनू तुला न भांडता , न चिडता सांगायचं असेल तर काय झालंय ते सांगशील? गेले दोन तीन महिने मी बघतोय यु हॅव चेंज्ड अ लॉट. प्रतीक्षा तुला आवडत नाही ते एक माणूस म्हणून की मी तुला तिच्याशी कम्पेअर केलं म्हणून , की तू ईनसिक्युर होते आहेस??? "

रेवा जरा वेळ शांत राहिली. मग मयंक च्या शर्ट च्या बाहीला आपलं नाक पुसलं. मग ती म्हणाली, " हो आधी मी ईनसिक्युर झाले खोटं का बोलू! पण नंतर मला स्वतःलाच लक्षात आलं की तू क्लीअर आहेस तुझ्या माईंड मध्ये असं काही नाही. पण माझ्या डोक्यात जातंय ते तुझं मला तिच्यासोबत कम्पेअर करणं. मला माहित आहे ती फार हुशार आहे. माझ्याहीपेक्षा आय टोटली अग्री. पण या पोस्ट पर्यंत यायला मी किती मेहनत केली हे तू का विसरतोस? सर्वांसमोर कँपरिजन करताना मला काय वाटेल आणि बाकी एम्प्लॉईज ना माझ्याबद्दल काय वाटेल हा विचार का करत नाहीस तू?? प्रत्येक वेळेस तू तुलना करतोस. बोलताना एकदाही विचार करत नाहीस. मी करू बॉस बरोबर तुझी तुलना?? बघ त्याचा बिझनेस आहे स्वतःचा. तू मात्र कॅलिबर असून नोकरासारखा खपतोयस इकडे... ! शिक जरा बॉस कडून कसा बिझनेस करायचा .... बोलायला सुरू करू हे ???

बोलता बोलता रेवा थांबली. मयंक हर्ट होणार हे माहीत असून ती हे बोलल्याबद्दल तिला वाईट वाटलं. मयंक ने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत जवळ घेत तिला म्हटलं, " पिल्लू मला माहित आहे तुला नोकरी करणं आवडत नाही. युअर ऍबिशन्स आर वेरी हाय. म्हणून तुला माझा , आपला स्वतःचा बिझनेस असावा असं वाटतं. यात चुकीचं काही आहे हे मी म्हणतही नाहीय. पण स्वतःच ऑफिस तयार करणं, बिझनेस सेट करणं सोपं नाहीय हे तुला नव्याने सांगायची गरज आहे का?? बरं मी प्रयत्न करतोय. नाही असंही नाही न? बघ भांडवल सेविंग सर्व आहे पण प्रोजेक्ट्स??? ते तरी हवेत?? नोकरी सोडून मी प्रोजेक्ट्स शोधत राहिलो तर मनी रोलिंग कसं होईल राजा??

रेवा बोलली , "सॉरी मी खूप रागात तुला हर्ट केलं. खरंच सॉरी.. मला तू प्रतीक्षा सोबत कॅम्पेअर करत जाऊ नकोस पण.. मला नाही आवडत".

मयंक हसला. बोलला , " सोनू एक सांगू?? गेले दोन महिने जे मी उशिरा येतोय ना, ते मी आपल्या प्रोजेक्ट साठी प्रेझेन्टेशन करतोय म्हणून. तुझ्या डोक्यात प्रतीक्षा च भूत आहे म्हणून तू मला एकदाही विचारलं नाहीस की तुला लेट का होतोय. मी खरतर परवा तुला तुझ्या वाढदिवशी हे सरप्राईज देणार होतो पण आताच सांगतो म्हणजे तुझ्या नाकावरचा राग निघून जाईल. आपल्याला आपले दोन स्वतःचे प्रोजेक्ट पुढच्या दोन महिन्यात चालू करायचेत. मी आपल्या ऑफिस साठी दोन जागा फायनल करून ठेवल्यात. त्यापैकी एक फिक्स करायचीय. ते ही होईल या मंथ एन्ड पर्यंत. सध्या आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. पण मला माहित आहे तुझ्या सॉलिड सपोर्ट वर मी हे सर्व करेन. ए बावळट तोंड मिट आधी. कम ऑन बेब्ज, कॉंग्रेट्स..... वि आर ओपनिंग आवर न्यू ऑफिस सून.''

रेवा काही न बोलता उठली. तोंड धुतलं. डोळ्यातले अश्रू, नाही आनंदाश्रू लपवत देवाला दिवा लावला. पिझेरिया मध्ये फोन करून डबल चीझ पिझ्झा आणि चॉकोलेट चिप आईस क्रीम ची ऑर्डर दिली आणि मयंक जवळ जाऊन बोलली, " व्हॉट???? बघतोयस काय बावळट सारखा??? पुढच्या महिन्यात आपली कंपनी चालू होतेय, नवीन कंपनी च रजिस्ट्रेशन , आपल्या ऑफिस मध्ये रेजिग्नेशन , उरलेली कामं क्लोज करणं... वेळ नाहीय आपल्याकडे..... "

मयंक हसला आणि त्याने रेवा ला घट्ट मिठीत घेतलं. बाहेर पिझ्झा डिलिव्हरी बॉय दरवाजा वाजवून वाजवून कंटाळून गेला...... एंडिंग ....... सॉरी सॉरी बिगीनिंग हॅपी झाली हे काय सांगायला हवं????

To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post