न्हाणीघरातील बाग

Published on

आज मी न्हाणीघराविषयी थोडी ईंटरेस्टिंग माहिती देणार आहे. घरामध्ये किंवा घराबाहेर शोभेची झाडं आपण नेहमीच लावतो पण न्हाणीघरात म्हणजेच बाथरुम मध्ये ही आपण शोभेची झाडं लावु शकतो. न्हाणीघरात शोभेची झाडं लावुन तुम्ही फक्त ती जागा सुंदर च नाही तर आल्हाददायक बनवु शकता. कसं? चला तर मग पाहुया. 

१. प्रकाश - 
न्हाणीघरातला कमी / मंद प्रकाश या प्रकारच्या झाडांसाठी पुरेसा असतो. मोठे न्हाणीघर मुंबई मध्ये मिळणे जरी दुरापास्त असले तरी तुम्ही लहान जागेत तुमची सुंदर कलाक्रुती तयार करु शकता. 
खुप वेळेस न्हाणीघरांमध्ये लहान खिडकी असते किंवा नसतेही. अशा वेळेला ईनडोअर प्लांट्स उपयोगी पडतात. त्यांना जास्त प्रकाशाची गरज नसते. अगदी ईवलुसा प्रकाश ही त्यांना पुरतो जो तुमच्या न्हाणीघरातील बल्ब पासुन मिळतो. 

२. पाणी - 

न्हाणीघरातील काहीसे दमट हवामान या झाडांसाठी पुरक असते. अगदी आंघोळ करतेवेळी जरी प्रत्येकाने थोडं थोडं पाणी शिंपडलं तरी चालुन जातं. 

३. जागा- 

न्हाणीघर लहान असो किंवा मोठे, ही झाडं ठेवायला जागेचं टेन्शन नको. जमिनीवर तर ह्यांच्या कुंड्या ठेवु नाही शकत आपण. पण एखादा सुशोभित शेल्फ बनवुन त्यावर कलात्मकरित्या कुंड्या किंवा पाॅट्स आपण ठेवु शकतो. सिलींग ला कुंडी लटकवु शकतो किंवा खिडकी च्या कडेला ही ठेवु शकतो. 

४. कोणती झाडं लावु शकतो?? 

 कोरफड , बांबु , कोणतेही बोन्साय , बेगोनिया , आॅर्किड , पिस लिली , बोस्टन फर्न 

ही झाडे तुम्हाला कुठल्याही नर्सरीत अगदी नाममात्र किंमतीस उपलब्ध होतात. 
तर मग, बनवणार स्वतः स्वतःचं न्हाणीघर सुंदर? 

 

 

 

 

 

 

 

 

अनिश्का. 

To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post